Breaking News

'गुड टच व बॅड टच' या विषयावर आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर फलटण येथे मार्गदर्शन

Guidance on 'Good Touch and Bad Touch' at Anandvan Primary School, Phaltan

    कोळकी (प्रतिनिधी) - फलटण येथील श्री सद्गुरू हरिबुवा  महाराज शिक्षण संस्थेच्या आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर फलटण येथे फलटण तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने "निर्भया पथकांतर्गत " शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक, ग्रामस्थ यांना निर्भया पथक प्रमुख महिला काॅन्सटेबल वैभवी भोसले मॅडम यांनी गुड टच व बॅड टच या बाबत मार्गदर्शन केले. 

  या ऑनलाइन मार्गदर्शन पर व्याख्यान  संस्थेच्या सचिव  ॲड .सौ. मधुबाला भोसले, शाळेचे मुख्याध्यापक कैलास घाटगे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, उपस्थित होते. 

      यावेळी निर्भया पथक प्रमुख महिला हेडकाॅन्सटेबल वैभवी भोसले मॅडम यांनी निर्भया पथक स्थापनेचा उद्देश व कल्पना सांगितली व 1091 या हेल्पलाईन नंबर विषयी मार्गदर्शन व माहिती वेगवेगळ्या उदाहरणासह सांगून  भोसले मॅडम यांनी आपल्या सोबत अनुचित प्रसंग अथवा घटना  घडल्यास काय करावे,प्रसंगावधान राखून आपण काय कृती केली पाहिजे ,तसेच समाजात वावरत असताना भेडसावणाऱ्या समस्या व त्यावर आपण कशी मात करावयाची,मुलांनी मुलींनी आपणास होणारा दुसर्या व्यक्तिचा स्पर्श चांगला का वाईट आहे ते ओळखून सावधनता बाळगावी,आपल्या पाल्यांच्या निदर्शनास आणून द्यावे  आदी विषयी विस्तृतपणे मार्गदर्शन  केले.

      प्रदिप चव्हाण यांनी  सुत्रसंचालन केले वआभार मानले. कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments