ॲड. जावेद मेटकरी यांची उपभोगता संरक्षण समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड
फलटण दि. १६ सप्टेंबर ( गंधवार्ता वृत्तसेवा) - प्रांतीय उपभोगता संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी जेष्ठ विधितज्ञ ॲड. जावेद मेटकरी यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ॲड. जावेद मेटकरी यांनी सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून उत्कृष्ठ काम केल्याने त्यांची दखल घेऊन त्यांना राज्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
केलेल्या चांगल्या कामाची माहिती घेत राज्य अध्यक्ष सुनील ढमाळ यांनी त्यांची निवड जाहीर केली. दरम्यान, सार्वजनिक जीवनात सर्वांना बरोबर घेऊन नेहमीच सामान्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या ॲड. जावेद मेटकरी यांच्या माध्यमातून व प्रांतीय उपभोगता सरंक्षण समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वांना न्याय मिळणार असल्याने, त्यांच्या निवाडीमळे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
No comments