Breaking News

जिल्ह्यात बारा ठिकाणी राष्ट्रीय लोकअदात संपन्न ; प्रलंबितमध्ये 29 कोटी तर वादपूर्व प्रकरणांमध्ये 4 कोटींची रक्कम वसूल

National Lok Adalat held at twelve places in the district ; Recovery of 29 crore in pending cases and Rs. 4 crore in disputed cases

        सातारा   (जिमाका): जिल्ह्यात एकूण बारा ठिकाणी राष्ट्रीय लोक अदालतीचे नियोजन करण्यात आले होते. या लोकअदालतमध्ये  1580 प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोडीने 29 कोटी 29 लाख 79 हजार 311 इतकी वसुली करण्यात आली. तर, 16206 वादपूर्व प्रकरणांमध्ये 4 कोटी 22 लाख 43 हजार 210 एवढी रक्कम वसूल करण्यात आली. त्याचप्रमाणे वाहतुक शाखेकडील मोटार वाहन अधिनियमाखालील ई-चलनाची 2305 प्रकरणे निकाली निघून त्यामध्ये एकूण 39 लाख 45 हजार 550 एवढी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.

      एल. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली या लाकअदालतीचे उद्घाटन  गुगल मीट इंटरनेट वरुन करण्यात आले. प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एल. मोरे यावेळी जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळकुटे, शरद पवार, सचिव श्रीमती तृप्ती जाधव, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. बी. देसाई, मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. राठोड, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष  सुखदेव भोसले उपस्थित होते.

No comments