फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांच्या व्याख्यानाचे आयोजन
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नामदेव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय व महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचा उपक्रम
फलटण : येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीजींचे योगदान’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार, दैनिक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंतराव भोसले यांचे व्याख्यान बुधवार दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता नामदेवराव सूर्यवंशी बेडके कॉलेजमध्ये कोवीड-19च्या नियमांचे पालन करून आयोजित केलेले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) हे असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ हे उपस्थित राहणार आहेत.
तरी या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक राऊत व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले आहे.
Post Comment
No comments