Breaking News

रयत सेवक को. ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सर्व जागा ताकतीने लढवणार - श्री नंदकिशोर गायकवाड

Rayat Sevak Co-operative Bank will contest all the seats in the election - Shri Nandkishore Gaikwad

    सातारा - रयत सेवक मित्र मंडळ संघटनेचा सातारा जिल्ह्यातील सेवकांचा मेळावा महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज दहिवडी येथे दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सेवकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये निवृत्ती वेतन प्रस्ताव, वरिष्ठ वेतन श्रेणी, शिक्षकेतर कर्मचारी प्रमोशन, अर्धवेळ रयत सेवक, लमसम सेवकांचे प्रश्न, रयत सेवक बँक सभासद लाभांश, कमीत कमी व्याजदर, मयत सभासद व त्यांचे जामीनदार, समायोजनाने आलेल्या सर्व सेवकांना सभासद करून घेणे विषयी चर्चा करण्यात आली. तर रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आगामी निवडणुकीविषयी सविस्तर चर्चा करून निवडणूक संघटनेच्या वतीने संपूर्ण ताकतीने लढविण्याची घोषणा करण्यात आली.

     रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली. शरद यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभे प्रसंगी रयत बँकेचे माजी संचालक श्री शिंगाडे सर, रयत सेवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री नंदकिशोर गायकवाड ,रयत सेवक मित्र मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते व माजी प्राचार्य श्री सोनाजी भोसले, रयत सेवक मित्र मंडळाचे उपाध्यक्ष श्री कांबळे के .टी .सर सातारा जिल्हाध्यक्ष श्री मनोहर तांबे सर यांच्यासहित सर्व रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

   प्रारंभी कोरोना जागतिक महामारी मुळे मयत झालेल्या रयत शिक्षण संस्थेतील सेवक व रयत शिक्षण संस्थेशी जोडले गेलेल्या सर्व मयत व्यक्तींना रयत सेवक मित्र मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मा. मुख्याध्यापक, प्राचार्य, व शिक्षकांचा अभिनंदनाचा ठराव  करण्यात आला.

     मेळाव्याचे अध्यक्ष शरद यादव यांनी संघटनेच्या ध्येयधोरण याविषयी मार्गदर्शन केले. तर रयत बँकेचे माजी संचालक श्री शिंगाडे सर यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. तसेच रयत सेवक मित्र मंडळाच्या वाटचालीविषयी मार्गदर्शन  श्री सोनाजी भोसले यांनी केले. मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री नंदकिशोर गायकवाड सर यांनी मित्रमंडळ संघटनेने वेळोवेळी केलेली आंदोलने उपोषणे व प्रामुख्याने बदली, सेवाज्येष्ठते बाबतचा निर्णय ,कला शिक्षक , पदवीधर वेतनश्रेणी या प्रश्नाबाबत सतत संघटनेच्या वतीने केलेल्या पाठपुराव्याची माहिती पुराव्यासह माहिती दिली व संस्थेने राबविलेल्या पारदर्शक पदोन्नती प्रक्रिया बद्दल संस्थेचे अभिनंदन केले. सेवकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी संघटना व संस्था प्रशासन यांचे मध्ये सद्यपरिस्थितीत चांगल्या प्रकारचा समन्वय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

   रयत सेवक मित्र मंडळाचे  उपाध्यक्ष श्री खंडू कांबळे यांनीही मार्गदर्शन केले तसेच सातारा जिल्हाध्यक्ष श्री तांबे सर यांनी प्रास्ताविकात सर्व पाहुण्यांचे स्वागत केले तसेच सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र शिर्के सर यांनी रयत सेवक मित्र मंडळ ही चळवळीतील कार्यकर्त्यांची संघटना असून रयत सेवकांच्या विविध प्रश्नांना न्याय देईल असे मत व्यक्त केले .याप्रसंगी मित्र मंडळाचे सचिव श्री भीमा लेंभे ,संघटक श्री दिपक भोये, मुख्याध्यापक श्री तुपे टी.सी., सातारा विभागीय सचिव श्री सोमनाथ बनसोडे , श्री केंद्रे सर, श्री मंगेश वडेकर ,यांचे सहित सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमध्ये मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री नंदकिशोर गायकवाड यांनी स्वतःसह, इतर दोन उमेदवारांच्या उमेदवारीबाबत घोषणा करताच सभागृह टाळ्यांच्या गजराने दणाणून गेले व उर्वरित 14 उमेदवारांच्या घोषणाही टप्प्याटप्प्याने करण्यात येतील असे जाहीर केले. तसेच रयत सेवक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता बँकेच्या सभासदांशी संपर्क करण्याचे आव्हान केले व आपले सहित संघटनेची राज्य कार्यकारिणी लवकरच संपूर्ण बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये दौरा करणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमास रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केंद्रे सर यांनी केले व आभार श्री नवनाथ बनसोडे यांनी मानले. व कोरोना नियमांचे पालन करून सभा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. सभा यशस्वी होण्यासाठी सातारा जिल्हाध्यक्ष मनोहर तांबे यांच्या नेतृत्वाखाली   श्री राजेंद्र शिर्के, श्री मंगेश वडेकर, श्री नवनाथ बनसोडे, श्री केंद्रे सर ,यांनी परिश्रम घेतले.

No comments