श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालयाचे पदव्युत्तर प्रवेश परिक्षेत यश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय फलटण येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत २०२०-२०२१ मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. सन २०२०-२०२१ मध्ये महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांच्यामार्फत कृषि व उद्यानविद्या पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी ऑगस्ट २०२१मध्ये राज्यस्तरीय परिक्षा घेण्यात आली होती. या प्रवेश परिक्षेचा निकाल बुधवार दिनांक १६.०९.२०२१ रोजी जाहीर झाला. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील ६ व कृषि महाविद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांनी या पदव्युत्तर प्रवेश परिक्षेत यश संपादन केले आहे.
उद्यानविद्या महविद्यालयाची विद्यार्थीनी निकीता गायकवाड, धनश्री मोरे, तेजस्वीनी वारीक, स्नेहल यादव, ऋतुजा शिंदे, महेश गोरे तसेच कृषि महाविद्यालयाची विद्यार्थीनी जयश्री लोखंडे, अक्षय कदम, राकेश मुळीक, सुर्यकांत जगदाळे, विनोद चव्हाण, सुरज शिंदे यांनी यश मिळवले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्याचे मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती, विधानपरीपद, महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर चेअरमन, कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण व चेअरमन, मे.ग. को फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, मा. श्रीमंत संजीवराजे नाई क निंबाळकर मा. अध्यक्ष, सातारा जिल्हा परीषद, सातारा व सेकेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, मा. श्री. ए. एस. निकम सर प्रशासन
अधिकारी, फ.ए.सो. फलटण मा. श्री. श्रीकांत फडतरे अधिक्षक फ.ए.सो. फलटण यांनी अभिनंदन केले. तसेच श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निवाळकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. त्याच बरोबर विद्यार्थ्याना दिपस्तंभ कृषि युवा मंचाचे सल्लागार प्रा. डी. ए. कुलाळ, डॉ. धायगुडे जी एस व पा. ए. आर. फडतरे यांच्यासह सर्व प्राध्यापकाचे मार्गदर्शन लाभले. या मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि मदत करण्यात येते.
No comments