सासकल येथे बिगर परवाना देशी दारु ; युवकावर गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ सप्टेंबर - सासकल गावच्या हद्दीत बेकायदा बिगर परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेली ९०० रुपयांची देशी दारु सापडल्या प्रकरणी सासकल ता.फलटण येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, सासकल गावच्या हद्दीत दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास दिनेश दत्तात्रय मुळीक वय २७ वर्ष रा. सासकल ता. फलटण जि. सातारा याच्याकडे बेकायदा बिगर परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेली ९०० रुपयांची देशी दारु सापडली आहे. यामध्ये टॅंगो प्रीमियम असे लेबल असलेल्या देशी दारूच्या प्रत्येकी ९० मिली च्या एकूण ३० सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्या सापडल्या आहेत.
अधिक तपास पोलीस हवालदार लीमन हे करीत आहेत.
No comments