फलटण तालुक्यात 22 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहरात 7
फलटण दि. 2 ऑक्टोबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 1 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 22 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 15 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 1 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 22 बाधित आहेत. 22 बाधित चाचण्यांमध्ये 11 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 11 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 15 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात धुमाळवाडी 2, खटकेवस्ती 1, मुंजवडी 2, पिंप्रद 1, विडणी 2, निंबळक 1, सुरवडी 1, बरड 1, कुरवाली बु 1, हिंगणगाव 1, साठे 1, आंदरुड 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments