फलटण तालुक्यात 25 कोरोना बाधित ; सर्वाधिक गिरवी 5
फलटण दि. 1 ऑक्टोबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 25 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 4 रुग्ण तर ग्रामीण भागात 21 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक गिरवी येथे 5 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 25 बाधित आहेत. 25 बाधित चाचण्यांमध्ये 11 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 14 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 4 तर ग्रामीण भागात 21 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात ठाकुरकी 2, विडणी 1, गिरवी 5, शेरेवाडी 1, शेरेशिंदेवाडी 1, सोमंथळी 4, गुणवरे 1, कोळकी 1, भाडळी खुर्द 1, साठे 1, दुधेबावी 1, तांबवे 1, जाधववाडी 1रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments