फलटण तालुक्यात 29 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहरात 7
फलटण दि. 4 ऑक्टोबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 29 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 22 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक जाधववाडी येथे 3 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 29 बाधित आहेत. 29 बाधित चाचण्यांमध्ये 19 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 11 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 22 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात जाधववाडी 3, गिरवी 2, सरडे 2 आंदरुड 1 विडणी 1, धुळदेव 1, साखरवाडी 1, आसू 1, तांबवे 1, चौधरवाडी 2 राजाळे 1, सासवड 1, हिंगणगाव 1, कोळकी 1, धुमाळवाडी 1, हनुमंतवाडी 1, खुंटे 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments