फलटण तालुक्यात 35 कोरोना बाधित ; सर्वाधिक साखरवाडी 8
फलटण दि. 3 ऑक्टोबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 35 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 4 रुग्ण तर ग्रामीण भागात 31 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक साखरवाडी येथे 8 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 35 बाधित आहेत. 35 बाधित चाचण्यांमध्ये 22 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 13 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 4 तर ग्रामीण भागात 31 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात साखरवाडी 8, गिरवी 6, घाडगेमळा 1, अंडरुड 1, निंबळक 1, राजुरी 1, गुणवरे 1, विडणी 1, शिंदेवाडी 1, कोळकी 2, चौधरवाडी 2, टाकळवाडा 1, राजाळे 1, सोमंथळी 1, वाठार निंबाळकर 1, रावडी बुद्रुक 1, फरांदवाडी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments