Breaking News

सदगुरु पतसंस्था ही कोअर बँकिंग प्रणाली राबविणार ; सभासदांना 9 टक्के लाभांश - दिलीपसिंह भोसले

सर्वसाधारण सभेत बोलताना दिलीपसिंह भोसले शेजारी  तेजसिंह भोसले, राजाराम फणसे
Sadguru Patsanstha will implement core banking system - Dilipsinh Bhosale

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - गेले दिड दोन वर्ष कोरोणामुळे सर्वच क्षेत्रात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले ,  सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला त्याचा फटका सहकार क्षेत्रालाही बसला, पतसंस्थांची वसुली करताना अनंत अडचणी आल्या अशाही परिस्थितीत  सदगुरु  पतसंस्थेने पारदर्शी व काटकसरीने काम करीत उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्न करून सभासदांना 9 टक्के लाभांश देत आहे, ही खरोखरच आजच्या परिस्थितीत कौतुकाची बाब  असून  इतर बँकांप्रमाणे सदगुरु पतसंस्था ही कोअर बँकिंग प्रणाली राबविणार आहे.  असे प्रतिपादन सदगुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.

    श्री सदगुरु  हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या; फलटण या संस्थेच्या 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.  याप्रसंगी चेअरमन श्री. तेजसिंह भोसले, व्हा.चेअरमन राजाराम फणसे,  अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले,  सुभाष आढाव  महाराजा मल्टीस्टेट चे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, खुंटे विकास सोसायटी  मा. चेअरमन  जालिंदर खलाटे,सहकार महर्षी हणमंतराव पवार कुकुटपालन संस्थेचे व्यवस्थापक मानाजीराव चव्हाण  व  संचालक उपस्थित होते.

    श्री भोसले म्हणाले सन 2021-22 हे वर्ष सुद्धा फार अडचणीचे ठरत आहे काटकसर प्रामाणिकपणा जपत संस्थेच्या वाढीसाठी आपण प्रयत्नशील आहोत शाखांचे कामकाज चांगल्या पद्धतीने व उद्दिष्टांची पूर्तता व्हावी यासाठी शाखांना आपण प्रोत्साहनपर बक्षिसेही देत आहोत बहुतांश प्रमाणात प्रॉपर्टी ही पुरुषांच्या नावावर असल्याने महीला पतसंस्था अशा परिस्थितीत चालविणे अडचणीचे ठरत आहे यामुळे फलटण शहरातील महिलांसाठी कार्यरत असणारी नामांकित स्वयंसिद्धा पतसंस्था ही आपण सद्गुरू पतसंस्थेत विलीन करण्याचा निर्णय घेत आहोत ज्यामुळे सभासदांचे हित निश्चितच जोपासले जाईल असा विश्वास श्री. भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

    प्रास्ताविक व स्वागतामध्ये चेअरमन तेजसिंह भोसले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर  करताना  म्हणाले, अनंत अडचणी  असुनही संस्थेने नावलौकीक कायम ठेवला आहे. संस्थेकडे 53 कोटी 27 लाख ठेव असुन 40 कोटी 82 लाख रू. कर्जवाटप झालेली आहे. संस्थेस आर्थिकवर्षात 1कोटी 22 लाख 34 हजार रूपये नफा झाला असुन सभासदांना 9% लाभांश दिला जाणार आहे.  

प्रारंभी प्रतिमा पुजन आणि श्रध्दांजली अर्पण केल्यावर सभेच्या मुख्य कार्यक्रमास सुरवात झाली. संस्थेचे सरव्यवस्थापक श्री. संदिप जगताप यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषय एकमताने मंजुर करण्यात आले. संचालक राजाराम  फणसे यांनी आभार मानले. सदर सभेसाठी ठेवीदार, कर्जदार, सभासद,  उपस्थित होते.सोशल डिस्टन् सिंग,व कोरोना संबंधी चे नियमास अधीन राहून सभा संपन्न झाली

No comments