Breaking News

तळीरामांनो सावधान! पोलिसांकडून विमानतळावरील तळीरामांवर गुन्हे दाखल

Alcohol drinkers beware! Police file charges against airport drinkers

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -विमानतळ फलटण येथे आपला दारू पिण्याचा अड्डा बनवणाऱ्या व सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या तळीरामांवर फलटण शहर पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. 

    शहरातील विमानतळावर असणारे प्रसन्न वातावरण व शुद्ध हवेच्या सानिध्यात सकाळी व संध्याकाळी पुरुष, महिला वॉकिंग व योगासने यासाठी येत असतात. तर लहान मुले, युवक, युवती खेळ व एक्सरसाईज करत असतात. मात्र काही तळीराम आपल्या शौकपाण्यासाठी हे आरोग्यदायी वातावरणात, खराब करून, सार्वजनिक शांततेचा भंग करत असतात. रात्री ठिकठिकाणी हे तळीराम बाटल्या, ग्लास व खाण्याचे पदार्थ घेऊन विमानतळावर बसतात. पितात - खातात व दंगा मस्ती करत, बाटल्या,डिशेस, खरकटे  तेथेच टाकून निघून जातात्. तर आशा या तळीरामांवर फलटण शहर पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने, नागरिकांच्यातून याचे स्वागत होत आहे. मात्र या कारवाईत पोलिसांनी सातत्य ठेवून अशा तळीरामांचा पुरा बंदोबस्त करावा.

    दि. 19 ऑक्टोबर 2021 रोजी शहरात पेट्रोलींग करीत असणाऱ्या पोलिसांना, विमानतळ फलटण येथे  आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असणारे युवक मिळून आले. त्यांचे डोळे तारवटलेले असुन लाल दिसत होते. त्यांच्या तोंडाचा आंबट व उग्र वास येत होता. म्हणुन त्यांना उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे मेडीकल करण्याकरीता नेले असता, वैदयकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय फलटण यांनी त्यांनी मादक पदार्थाचे सेवन केले आहे असे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

No comments