मंडई घेणाऱ्या वृद्धेस मोटर सायकलची धडक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मुंजवडी येथे भाजी मंडई घेत असलेल्या वृद्धेस दुचाकी स्वाराने रॉंग साईडला येऊन धडक दिल्याप्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि.24 /10/2021 रोजीचे सायंकाळी 5:30 सुमारास मौजे मुंजवडी ता.फलटण येथे,श्रीमती अलका तुकाराम गायकवाड वय - 69 वर्ष या गुरसाळे ते मुंजवडी जाणारे सिमेंटचे रोडच्या पूर्व बाजूस साईड पट्टीवर भाजीपाला विकत घेण्यासाठी थांबल्या असताना, गुरसाळे बाजू कडे जाणारा मोटर सायकल क्रमांक एम एच १२ बीसी १९५२ वरून एक इसम भरधाव वेगात गाडी चालवून रोडच्या चुकीच्या बाजूला येऊन मोटरसायकल धडकून त्यांना खाली पाडले. व मोटरसायकलस्वार तेथून पसार झाला. झालेल्या अपघातामध्ये वृद्धेच्या डाव्या पायाच्या खुब्याचे हाड फॅक्चर झाले असल्याची फिर्याद श्रीमती अलका तुकाराम गायकवाड यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस शिंदे हे करीत आहेत.
No comments