Breaking News

नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या नोंदणी व पुनर्नोंदणीबाबत आवाहन

Appeal regarding registration and re-registration of Civil Defense Volunteers

    मुंबई -: नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर विमोचन व मदतकार्य केलेले आहे. नागरी संरक्षण दलाची व्याप्ती नागरी संरक्षण शहरापुरती मर्यादित न ठेवता वाढविण्याचे धोरण आहे. आपत्कालीन उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या सहा नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती नागरी संरक्षण संचालनालयाचे संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

    नागरी संरक्षण दलामध्ये सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी व पुनर्नोंदणी करावी असे आवाहन नागरी संरक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

    राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे. तरी, ज्या नागरिकांना नागरी संरक्षण दलामध्ये स्वंयसेवक म्हणून सदस्य व्हावयाचे आहे त्यांनी या विभागाची वेबसाईट http://maharashtracdhg.gov.in वर भेट द्यावी नागरी संरक्षण स्वंयसेवक नोंदणी व पुनर्नोंदणी फॉर्मस् दिलेल्या अटी, शर्तीसह डाऊनलोड करुन घ्यावेत. नोंदणी / पुनर्नोंदणी फॉर्म भरुन आपल्या क्षेत्रातील संबंधित नागरी संरक्षण कार्यालयाशी संपर्क साधून स्वतः सादर करावेत आणि पुढील प्रक्रियेबाबतची माहिती घ्यावी. स्वयंसेवक म्हणून आपले योगदान देशसेवेसाठी द्यावे, असे आवाहन नागरी संरक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

No comments