कराड येथे सापडलेल्या साजिया व जन्नत बालकांच्या नातेवाईकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
सातारा (जिमाका): कु. साजिया सोनू खान वय 3 वर्षे व कु. जन्नत सोनू खान वय वर्षे 2 कराड शहर पोलीस स्टेशनच्या सैदापूर कॅनल परिसरात निराधार फिरत असल्याने कराड शहर पोलीसांनी बाल कल्याण समिती सातारा यांच्यासमोर हजर करुन द्रोणागिरी शिक्षण संस्था संचिलत शिशुगृह. म्हसवड ता. म्हसवड संस्थेत पुढील काळजी, संरक्षण व संगोपनासाठी दाखल करण्यात आले आहे. तरी पालकांनी अथवा नातेवाईकांनी बाल कल्याण समिती, सातारा निरीक्षण गृह/बालगृह सातारा दूरध्वनी क्रमांक 02162-238025, जिल्हा बाल संरक्षण कक्ष बस स्टॅन्डच्या पाठीमागे प्रशासकीय इमारत दुसरा मजला, सातारा दूरध्वनी क्रमांक 02162-237353 द्रोणागिरी शिक्षण संस्था म्हसवड दूरध्वनी क्र.9112908689 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही.ए. तावरे यांनी केले आहे.
No comments