Breaking News

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी श्रीमंत रामराजे, पालकमंत्री, छ. उदयनराजे यांच्यासह मान्यवरांचे अर्ज दाखल ; तीन बिनविरोध

Application of dignitaries including Shrimant Ramraje, Guardian Minister, Udayanraje for the election of Satara District Bank;  Three unopposed

  फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ ऑक्टोबर - सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. आज महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोसायटी मतदारसंघातून तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी देखील सोसायटी मतदार संघातून तसेच खा. उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबत भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाणीपुरवठा संस्था , आ. जयकुमार गोरे, आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तसेच वि द्यमान संचालकांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

  आज शेवटच्या दिवसापर्यंत खरेदी-विक्री मतदारसंघ, महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला असल्यामुळे खरेदी-विक्री मतदारसंघातून आ. मकरंद पाटील, महाबळेश्वर विकास सेवा सोसायटीतून राजेंद्र राजपुरे आणि कृषिप्रक्रिया मतदारसंघातून शिवरूपराजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

No comments