फलटणच्या उर्दू शाळेला ११ वी,१२ वी च्या सर्व शाखा सुरू करण्यास मान्यता
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ ऑक्टोबर - फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटीच्या हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला, विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून ९ वी,१० वी तसेच ११ वी, १२ वी च्या सर्व शाखा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्याबद्दल श्रीमंत रामराजे यांचे, फलटण तालुका मुस्लिम समाज व फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटी तर्फे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष इम्रान कुरेशी, हाजी शकूर कुरेशी, हाजी नियाज अहमद कुरेशी, सलीम (वस्ताद ) शेख, हाजी सलीम कुरेशी, महंमद रफीक शेख, आतार सर, हाफीज महेबूब सय्यद, हाफीज सलीम, सैफ शेख, जमीर शेख, मुक्तार कुरेशी, तालीफ कुरेशी, मुहमद कुरेशी, सलाम कुरेशी आदि मान्यवर उपस्थित होते.
कुरेशी नगर, फलटण येथे असणाऱ्या तालुक्यातील पहिल्या उर्दू शाळेमध्ये सध्या १ ली ते १० वीचे वर्ग सुरू आहेत. आणि आता ११ वी १२ वी च्या वर्गांना परवानगी मिळाल्याने ११ वी व १२ वीच्या वर्गांचे प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. फलटण तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपल्या मुला-मुलीचा प्रवेश घेण्यासाठी हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजशी किंवा इम्रान कुरेशी 9822617861, सैफ शेख 9595951102, शेख सर 9373659372 यांच्याशी संपर्क साधावा.
No comments