ग्रंथालये व वाचनालये सुरु करण्यास अटी व शर्तीसह मान्यता
सातारा (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारची ग्रंथालये व वाचनालये शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
ग्रंथालय व वाचनालयात ज्या नागरिकांनी कोविड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, अशाच नागरिकांना प्रवेश देण्यात यावा. ग्रंथालयामध्ये सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये कायमस्वरुपी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे. ग्रंथालयामध्ये सर्व नागरिकांनी तोंडाला मुखपट्टी (मास्क) बांधणे बंधनकारक आहे. तसेच सर्व ग्रंथालय व्यवस्थापकांनी ग्रंथालय वेळोवेळी सॅनिटाझेशन करणे बंधनकारक असून त्याचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील. आजारी व्यक्तींना ग्रंथालयामध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देण्यात येऊ नये. कोविड-19 बाबत राज्यस्तरावरुन व जिल्हास्तरावरुन वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.
अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
No comments