सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या आयुष शिंदेचे मल्लखांब स्पर्धेत उत्तुंग यश
सातारा - येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल मधील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या आयुष शिंदेने मल्लखांब स्पर्धांमध्ये विशेष उत्तम यश मिळवले त्याच्या या यशाबद्दल सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
बिभवी गावचे स्व. दादू गेनु शिंदे यांचे नातू कुमार आयुष तुषार शिंदे याने मध्य प्रदेश उज्जैन येथे पार पडलेल्या 32 वी राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा2021 मध्ये तीन सुवर्णपदक व एक रौप्य पदक प्राप्त केले. 12 वर्षाखालील गटामध्ये त्याने हे विशेष यश संपादन केले असून अगदी लहान वयापासूनच त्याचे मल्लखांब तील प्रवीण हे विशेष कौतुकास्पद आहे.
त्याच्या या यशामागे शिवछत्रपती पुरस्कार विजेते विश्वतेज मोहिते सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या क्रीडा विभागाचे सुधाकर गुरव ज्येष्ठ मल्लखांबपटू व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुजीत शेडगे यांनीही त्याला मार्गदर्शन केले या यशाबद्दल आयुष्याचे शाळेच्या शालाप्रमुख सौ. मनिषा मीनोचा यांनी कंदी पेढे भरून त्याचे कौतुक केले .तसेच त्याला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपशाला प्रमुख सौ .सुजाता पाटील पर्यवेक्षिका श्रीमती विनया कुलकर्णी आयुष चे वडील तसेच क्रीडा विभागाचे सुधाकर गुरव व सदस्य उपस्थित होते.
आयुषने आपल्या महाराष्ट्राचे नाव सातारा जिल्ह्याचे तसेच जावली तालुक्याचे नाव ,आपल्या गावचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले आहे त्याच्या या यशात शाळेचे व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे विशेष योगदान आहे अशा शब्दात आयुष्य वडील तुषार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
No comments