श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रभाग क्र 2 मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन
फलटण (प्रतिनिधी) दि. 2 ऑक्टोबर :- फलटण नगरपरिषद फलटणच्या वतीने फलटण नगर परिषद दलित वस्ती विकास निधी अंतर्गत प्रभाग क्र. २ मधील रविवार पेठ येथे मच्छिमार्केट व मटण मार्केट इमारतीचे भूमिपूजन, तसेच मंगळवार पेठ येथील जिम इमारत व वाचनालय इमारतीचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी १०:३० वाजता संपन्न होत आहे.
भूमिपूजन व उद्घाटन समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण तर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे व नगरसेवक सनी संजय अहिवळे व इतर नगरसेवक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
No comments