Breaking News

आधुनिक शहराकडे फलटणची वाटचाल सुरू ; आधुनिक मटण मार्केट व मच्छी मार्केटचे श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते भूमिपूजन

मटण मार्केट व मच्छी मार्केट इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सौ. नीता मिलिंद नेवसे, नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे , नगरसेवक सनी संजय अहिवळे
Bhumi Pujan of  Meat Market and Fish Market at the hands of Ramraje Nike Nimbalakar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३ ऑक्टोबर - फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३ ऑक्टोबर -  21 व्या शतकातल्या आधुनिक शहराकडे फलटणची वाटचाल सुरू असून, त्यादृष्टीने अत्याधुनिक असे मटण मार्केट व मच्छी मार्केट रविवार पेठ फलटण येथे साकारण्यात येणार आहे, त्याचा भूमिपूजन समारंभ आज विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. 

मटण मार्केट व मच्छी मार्केट इमारतीच्या आराखड्याची माहिती घेताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

   प्रभाग क्रमांक 2 मधील रविवार पेठ येथे साकारत असणाऱ्या मटण मार्केट व मच्छी मार्केट इमारतीच्या आराखड्याची माहिती श्रीमंत रामराजे यांनी घेतली. भूमिपूजन समारंभ प्रसंगी फलटण कोरेगाव कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सौ. नीता मिलिंद नेवसे, नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे , नगरसेवक सनी संजय अहिवळे, नगरसेविका ऍड मधुबाला दिलीपसिंह भोसले,  सौ. सुवर्णाताई खानविलकर, सौ. प्रगती कापसे, सौ वैशाली चोरमले सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. दिपाली निंबाळकर, नगरसेवक विक्रम जाधव, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, मुख्याधिकारी संजय गायकवाड नगर अभियंता साठे, कंत्राटदार व्ही. स्क्वेअर कन्स्ट्रक्शन चे विकास निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    विधानपरिषदेत सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण व इतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे व नगरसेवक सनी संजय अहिवळे यांनी केले.


No comments