Breaking News

विवाहितेच्या छळ प्रकरणी विडणी येथील चौघांविरोधात गुन्हा दाखल

Charges filed against four in Vidani in marital harassment case

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) -  नवऱ्याला  नोकरीस लावण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये असे म्हणून, विडणी येथील नवविवाहितेचा शारीरिक ,मानसिक छळ करून जाचहाट केल्याप्रकरणी विडणी येथील पती, सासू, सासरे व दिराच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार सौ सारिका सुशांत सोनवलकर या विवाहितेचा, दि. 08/12/2019 रोजी विवाह झाल्यापासून  दोन ते तीन महिन्यानंतर ते दि 19/10/20 21 रोजी पर्यंत  या कालावधीत सासरी मौजे विडणी ता.फलटण येथे असताना, सासरचे लोक तिचे पती सुशांत सोनवलकर,सासू विमल सोनवलकर,सासरे हनुमंत सोनवलकर,   दीर प्रशांत सोनवलकर यांनी विवाहितेस वारंवार उपाशीपोटी ठेवून, नवऱ्याला कायमस्वरूपी नोकरीस लावण्यासाठी, तू माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून शारीरिक ,मानसिक छळ करून जाचहाट केला असल्याची फिर्याद विवाहिता सौ सारिका सोनवलकर यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस शिंदे करीत आहेत.

No comments