1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी
सातारा (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. तरी 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या सर्व नागरिकांनी आपल्या नावाची मतदार यादीमध्ये नोंद करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांनी केले.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमूना नं.6 फॉर्म भरावा. यासाठी लागणारी कागदपत्रे वयाचा दाखला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, 10 वीचे मार्कलिस्ट, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड यापैकी एक. रहिवाशी दाखला रेशनकार्ड, भाडे करारनामा (3 वर्षे), पाणी बील, लाईट बील, टेलिफोन बील यापैकी एक. तसेच 3 आयकार्ड साईज कलर फोटो
मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमूना नं 7 चा फार्म भरावा. यासाठी लागणारे कागदपत्र मयत असल्यास मृत्युचा उतारा, विवाह झाल्याने नाव कमी करावयाचे असल्यास लग्नपत्रिका/विवाह नोंदणी प्रमाणपत्र, स्थलांतरित झाले असल्यास पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक, रेशनकार्ड, भाडे करारनामा (3 वर्षे), पाणी बील, लाईट बील, टेलिफोन बील.
मतदार यादीतील दुरुस्तीसाठी नमुना नं.8 चा फॉर्म भरावा. यासाठी लागणारे कागदपत्र ज्या गोष्टी दुरुस्त करावयाच्या आहेत त्या संबंधित पुरावा. वयाचा पुरावा यासाठी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड यापैकी एक. रहिवाशी दाखला पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक/पोस्ट पासबुक, नॅशनल बँक, रेशनकार्ड, भाडे करारनामा (3 वर्षे), पाणी बील, लाईट बील, टेलिफोन बील यापैकी एक.
मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना नं.8-अ चा फॉर्म भरावा. यासाठी लागणारे कागदपत्रे रहिवाशी पुरावा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक/पोस्ट पासबुक, नॅशनल बँक, रेशनकार्ड, भाडे करारनामा (3 वर्षे), पाणी बील, लाईट बील, टेलिफोन बील, गॅस कनेक्शन बील.
मतदार नाव नोंदणी करण्यासाठी नमुना नं.6 चे फॉर्म तसेच नमुना नं.7,8 व 8-अ चे फॉर्म भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावेत. तसेच ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी NVS App किंवा Voters Helpline App डाऊनलोड करुन या ॲपचा मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी करावा, असेही आवाहनही उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांनी केले आहे.
No comments