सातारा जिल्ह्यात 217 कोरोनाबाधित ; 220 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 217 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 8 (9981), कराड 37 (38989), खंडाळा 7 (14116), खटाव 38 (25620), कोरेगांव 19 (21826), माण 16 (17760), महाबळेश्वर 0 (4676), पाटण 3 (10100), फलटण 23 (37049), सातारा 57 (51383), वाई 6 (15693) व इतर 3 (2117) असे आज अखेर एकूण 249310 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 220 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमूने – 2104221
एकूण बाधित – 249310
घरी सोडण्यात आलेले – 240353
मृत्यू –6098
उपचारार्थ रुग्ण– 5319
No comments