सातारा जिल्ह्यात 172 कोरोनाबाधित ; 6 बाधितांचा मृत्यू
370 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि.4 (जिमाका) : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 172 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 2 (9973), कराड 56 (38952), खंडाळा 2 (14109), खटाव 16 (25582), कोरेगांव 6 (21807), माण 5 (17744), महाबळेश्वर 1 (4676), पाटण 0 (10097), फलटण 21 (37026), सातारा 51 (51326), वाई 4 (15687) व इतर 8 (2114) असे आज अखेर एकूण 249093 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 370 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमूने – 2104221
एकूण बाधित – 249093
घरी सोडण्यात आलेले – 240133
मृत्यू –6098
उपचारार्थ रुग्ण– 5322
No comments