Breaking News

सातारा जिल्ह्यात 220 कोरोनाबाधित; 6 बाधितांचा मृत्यू

Corona virus Satara District updates :  6 died and 220 corona positive

44 जणांना दिला आज डिस्चार्ज

    सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 220 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

    तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

    जावली 2 (9983), कराड 9(38998), खंडाळा 8 (14124), खटाव 25 (25645), कोरेगांव 16 (21842), माण 11 (17771), महाबळेश्वर 1 (4677), पाटण 1 (10101), फलटण 48 (37097), सातारा 84 (51467), वाई 5 (15698) व इतर 10 (2127) असे  आज अखेर एकूण 249530 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच खंडाळा तालुक्यातील 1, खटाव तालुक्यातील 2,  कोरेगाव तालुक्यातील 1, सातारा तालुक्यातील  1, वाई तालुक्यातील 1  अशा 6 जणांचा कोरोना उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 44 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

एकूण नमूने – 2117035
एकूण बाधित – 249530
घरी सोडण्यात आलेले – 240397
मृत्यू –6109
उपचारार्थ रुग्ण– 5495

No comments