नगरसेवक गुंजवटे यांच्याकडून कै.भोईटे यांचे दालन वापरणे निंदणीय - अनुप शहा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३ ऑक्टोबर - फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे दुःखद निधन झाल्यामुळे उपनगराध्यक्षपद रिक्त आहे. परंतु फलटण नगरपरिषदेमध्ये असणारे उपनगराध्यक्ष यांचे दालन व खुर्चीचा वापर नगरसेवक पांडुरंग गुंजवटे हे करीत आहेत, हे निंदनीय असून, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होई पर्यंत उपनगराध्यक्षांची केबिन बंद ठेवावी अशी मागणी नगरसेवक अनुप शहा यांनी केली आहे.
उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांच्या निधनानंतर उपनगराध्यक्ष यांच्या खुर्चीवर बसून कारभार करताना नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांना लाज वाटत नाही का? असा सवाल नगरसेवक अनुप शहा यांनी केला आहे.
फलटण नगर परिषदेकडे फलटण शहर भाजपाध्यक्ष अमोल सस्ते व अनुप शहा यांनी उपनगराध्यक्ष यांचे दालन वापरणे बंद करावे, व जोपर्यंत उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होत नाही तोपर्यंत उपनगराध्यक्ष यांच्या दालनाचा वापर कोणालाही करू देऊ नये अशी मागणी निवेदन देऊन केली आहे.
No comments