Breaking News

1 कोटी 97 लाख 50 हजारांचा अपहार ; गारमेंट किंग प्लस दुकानातील कामगारांनीच केला विश्वासघात

Fraud of Rs 1 crore 97 lakh 50 thousand in Garment King Plus cloth shop in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ ऑक्टोबर -  गारमेंट किंग प्लस या कापड दुकाना मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी २०१८ पासून आजपर्यंत वेळोवेळी दुकानातील तयार कपडे परस्पर दुसऱ्या दुकानात विकून, तसेच दुकानातील बिलिंग कोड डिलीट करून व ग्राहकांच्या उधारीचे येणारे पैसे असा एकूण १ कोटी ९७ लाख ५० हजार २५५ रुपयांचा अपहार केला आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,  सन २०१८ पासुन ते आज पर्यंत वेळोवेळी सुमित हणमंराव जगदाळे व त्यांचे व्यवसाईक भागीदार घोंडीराम घाडगे यांच्या मालकीच्या गारमेंट किंग प्लस शाखा फलटण या दुकानामध्ये काम करण्यास असलेल्या इसम नामे 1) सुनिल मच्छिद्र दोरगे रा. यवत ता. पुरंदर जि. पुणे 2) प्रसाद प्रकाश पंडीत ( दुकान अंकाऊटं) रा. वडुज ता. खटाव  सातारा यांनी दुकान मालकांचा विश्वास संपादन करून, दुकानातील विवीध कंपनीचे व विवीध ब्रॅन्डचे लहान, मोठया पुरुष, महीला व बालकाचे शेकडो कपडयाचे आज पर्यंत एकुण 1,50,000 बारकोड (वस्तु आवक ) पैकी 45530 वस्तुचे बारकोड हे दुकानाचे बिलींग सिस्टीम मधुन डिलीट करुन, एकुण किंमत 1,90,94809/- एवढया रक्कमेचा अपहार केला. यापैकी काही माल पुसेगाव येथील इसम नामे 3) नितीन फडतरे यांच्या मालकीचे वैष्णवी कलेक्शन मध्ये तसेच गंगाखेड जि. परभणी येथील इसम नामे 4) सुरेश आचमे यांच्या मालकीचे राज भगीरथ नावाचे कापड दुकानात विक्री केला आहे. तसेच वरील दोघांनी बिलद्वारे विकलेल्या मालांपैकी ग्राहकांकडुन येणारे एकूण बाकी  6,55,446/- रुपये दुकाणाचे अकाऊंटला जमा न करता स्वताकडे स्वःताचे आर्थिक फायदयाकरीता ठेवुन घेऊन सुमित हणमंराव जगदाळे यांची एकुण 1,97,50,255/- रुपयांची फसवणुक केली असल्याची फिर्याद सुमित हणमंराव जगदाळे  मुळ रा. बिदाल ता. माण जि. सातारा हल्ली रा. बंगला नंबर 13 राधिका गार्डन कोळकी ता. फलटण यांनी दिली आहे.

    अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राऊळ हे करीत आहेत.

No comments