कोळकीतील सर्वे नं.२० मधील गोविंद पार्क प्रकल्प कायदेशीर ; जिल्हाधिकारी यांच्या आदेशा विरोधात अपील दाखल - सचिन भोसले
फलटण - (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि.६ ऑक्टोबर - मौजे कोळकीतील सर्वे नं.२० मधील गोविंद पार्क प्रकल्प बाबतीत जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेला निर्णय हा एक्स पार्टी असून, आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळालेली नाही, याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या विरोधात आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले आहे. यामध्ये आयुक्त यांनी अंतिम आदेश होईपर्यंत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशास जैसे थे (Status quo) आदेश दिला असल्याचे सांगतानाच मौजे कोळकीतील सर्वे नं.२० मधील गोविंद पार्क प्रकल्प कायदेशीर असल्याचे व्हीएनएस ग्रुपचे चेअरमन सचिन भोसले यांनी सांगितले.
मौजे कोळकी येथील सर्वे नं २० मधील गोविंद पार्क प्रकल्पातील पाडलेले भूखंड बेकायदेशीर असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला असून हा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप संजू वसंत काळे यांनी काल केला होता. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर देताना सचिन भोसले बोलत होते.
पुढे बोलताना सचिन भोसले म्हणाले, जिल्हाधिकारी सातारा यांनी य क्र.मह/३/जमिन/ना/कावी-१२५१/२०२१ दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेला आदेश, आम्हा सर्वाना मान्य नसल्यामुळे अतिरीक्त विभागीय आयुक्त यांच्यासमोर २९ सप्टेंबर २०२१ रोजी आम्ही सर्वांनी आमचे म्हणणे व सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखल करून अपील दाखल केले. त्याबाबत दिनांक ०४/१०/२०२१ रोजी, विभागीय आयुक्त यांनी जैसे थे (Status quo) चा आदेश दिला आहे. विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, आदेश प्राप्त करण्यापूर्वी जमीनधारक या नात्याने सध्याच्या अर्जातील अर्जदार यांना सुनावणीची कोणतीही संधी दिली नाही, कायद्याचे हे प्रास्तावित तत्व आहे, की एखादा आदेश एकाद्या व्यक्ती विरुद्ध पारीत करणे, प्रस्तावित असेल अश्या व्यक्तींना त्यांची बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय असा आदेश पारीत करता येत नाही, असा आदेश पारीत केल्याने नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग झाल्याचे यात स्पष्ट होत आहे त्यामुळे सदरील प्रकरणात पुढील सुनावणी होईपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला आहेत.
विरोधकांनी यापूर्वी अशा बातम्या देवून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधक यांनी जिल्हाअधिषक भूमिअभिलेख सातारा येथे दिनांक १५/०२/२०२१ रोजी तक्रार अर्ज केला होता, तो तक्रार अर्ज २९/०३/२०२१ रोजी अतितातडीने पोटहिस्सा मो.र.क्र.-मा.र.क. २७०१ चे कामकाज झालेले असून, त्यामध्ये कोणतीही चुकीची कारवाई झालेली नाही, असे नमूद करून सदर चा अर्ज निकाली काढला आहे. ती बाब जिल्हाधिकारी सातारा यांच्यापासून जाणून बुजून लपवून ठेवून, खोट्या स्वरूपाचा एक्स पार्टी आदेश करून घेतला आहे, तो आम्हास मुळीच मान्य नाही, त्यामुळे मौजे कोळकी येथील सर्वे.नं.२० मधील गोविंद पार्क हा प्रकल्प कायदेशीर असून, कोणत्याही ग्राहकाची आम्ही फसवणूक केली नसल्याचे सचिन भोसले यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त विभागीय आयुक्त यांची जैसे थे (Status quo) आदेश असूनही, विरोधकांनी मौजे कोळकीतील सर्वे नं.२० मधील गोविंद पार्क प्रकल्पाबाबत प्रसिध्द केलेल्या बातमी संदर्भात कोणत्याही, ग्राहकाने कसलाही गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन सचिन भोसले यांनी केले.
final nikal kay ahe ata
ReplyDelete