महाराजा मल्टीस्टेटचा कारभार पारदर्शक असल्याने संस्थेची वाटचाल कौतुकास्पद - रवींद्र बेडकीहाळ
फलटण - (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 7 ऑक्टोबर - आज जागतिकीकरण वेगाने वाढत असल्याने अनेक परदेशी विविध बँका ग्राहक संस्था यांचा विस्तार वाढत आहे. सध्याची केंद्रीय अर्थव्यवस्था सर्व एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याने पारदर्शक कारभार केल्यास संस्था टिकून राहणार आहेत. महाराजा मल्टी स्टेट चा कारभार पारदर्शक असल्याने या संस्थेची वाटचाल कौतुकास्पद आहे. केवळ अर्थार्जन न करता सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या महाराजा मल्टीस्टेट ने सभासदांना वैद्यकीय सेवा कमी खर्चात मिळेल यासाठीही प्रयत्न करावेत अशी अपेक्षा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष व साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ यांनी व्यक्त केली.
महाराजा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या 12 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बेडकीहाळ बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. सद्गुरू हरीबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले उपस्थित होते.
श्री. बेडकीहाळ सर म्हणाले सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्था प्रगतिपथावर असून सभासदांचा विश्वास जपण्यास यशस्वी ठरल्या आहेत ,त्यामुळेच संस्थेची प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता असल्याचे दिसत आहे. अध्यक्षस्थानावरून बोलताना तेजसिंह भोसले म्हणाले ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार काटकसरीने व पारदर्शकपणे संचालक मंडळाने कारभार केल्याने आज महाराजा मल्टीस्टेट ला नॅशनल अवॉर्ड तीन वेळा प्राप्त झालेला आहे. भविष्यात कोअर बँकिंगची सुविधा उपलब्ध करून अत्याधुनिक पद्धतीने संस्थेचा कारभार व कामकाज केले जाणार आहे. शासनाने घालून दिलेले कडक निर्बंध यामुळे ठेवीचा व्याजदर कमी झाला असून कर्जाचा ही व्याजदर आपणास कमी करावा लागलेला आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अत्याधुनिक व सर्व सुखसुविधा उपलब्ध करून संस्था अत्याधुनिक सुखसुविधा सभासदांना उपलब्ध होण्यासाठी संचालक मंडळ कार्यशील आहे.
प्रास्ताविकामध्ये बोलताना संस्थेचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी सन 2020-21 या आर्थिक वर्षात संस्थेस -- 1 कोटी 27-लाख नफा 63 कोटी ठेवी 49 कोटी कर्ज वाटप केले असून वार्षिक उलाढाल 404 कोटी असल्याचे सांगून संस्थेने संस्थेचे प्रधान कार्यालय अत्याधुनिक करण्यासाठी वाटचाल चालू केलेली आहे, तसेच नवीन शाखांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्या असून लवकरच त्यास मंजुरी मिळेल मंजुरी मिळाल्यानंतर नवीन शाखा सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे श्री भोसले यांनी याप्रसंगी सांगितले.
संस्थेचे सि.ई.ओ संदीप जगताप यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले व सूत्रसंचालन केले. संचालक राजाराम फणसे यांनी उपस्थितांचे आभार मानले .
सभेस संस्थेचे संचालक तसेच सभासद उपस्थित होते.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न झाली.
No comments