केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व खा. रणजितसिंह यांची भेट ; अडचणीत असणार्या उद्योगांना मिळणार मदत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ४ ऑक्टोबर - पश्चिम महाराष्ट्रात केंद्रीय पातळीवरुन नवीन उद्योग कशा पद्धतीने आणता येथील व यासाठी आर्थिक मदत कशी करता येईल, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील जे व्यवसाय अडचणीत आहेत त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी खासदार रणजीतसिंह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिली.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी, काल केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सपत्नीक सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री कराड बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व जिल्हा परिषद सदस्य सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांनी दोघांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी दोन्ही नेत्यांचे मध्ये झालेल्या चर्चेत पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने, सुतगिरणी, दुग्ध व्यवसाय, बँका जे अडचणीत आहेत, त्यांना बँकांच्या कडुन कशी मदत करता येईल. यासाठी ना. कराड यांनी खा. रणजितसिंह यांना पश्चिम महाराष्ट्रातील अडचणीत असलेल्या उद्योगांची यादी काढून त्यांची बैठक पश्चिम महाराष्ट्रात लावावी अशा सुचना केल्या व माझ्या कडुन संपुर्ण सहकार्य केले जाईल अशी ग्वाही मंत्री कराड यांनी दिली.
अडचणीत असलेल्या उद्योगांना आर्थिक मदत दिल्याने औद्योगिक क्षेत्रास चालना मिळणार आहे. पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, यूवक यांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होतील व या भागाचा आर्थिक विकास होईल. यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे आभार मानले.
No comments