वाढदिवस साजरा न करण्याचा आमदार दीपक चव्हाण यांचा निर्णय
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० ऑक्टोबर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार दीपक चव्हाण यांनी घेतला असून, वाढदिवसानिमित्त आपण जिथे असाल, तिथूनच मला आर्शिवाद व शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले आहे.
आज आपल्या महाराष्ट्र राज्यावर नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. गेली दीड-दोन वर्षे आपण सगळे एकत्रितपणे या संकटाविरुद्ध लढा देत आहोत. समाधानाची बाब म्हणजे यामध्ये काही अंशी यशस्वी झालो आहोत. मात्र, या कोरोना संकटावर कायमची मात करणे हेच आपले सर्वांचे एकमेव ध्येय आहे. त्यामुळे अजूनही आपल्याला सदैव सतर्क राहावे लागणार आहे. या महामारीमध्ये आपण ज्या अनेक जीवलगांना मुकलो आहोत. त्यांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. या सर्व पार्श्वभूमीवर आज शनिवार, दिनांक ३० ऑक्टोबर रोजी माझा वाढदिवस आहे, तो मी साजरा न करण्याचे ठरविले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जिथे असाल, तिथूनच मला आर्शिवाद व शुभेच्छा द्याव्यात. तसेच प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करुन आपण प्रशासनाला सहकार्य करुया. आपण सर्वजण कोरोना संसर्ग होणार नाही याची काळजी घेवूया, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट ठरेल असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले आहे.
No comments