Breaking News

शिवाजीनगर, फलटण येथील बोळात नवजात अर्भक सापडले

A newborn baby was found in Shivajinagar, Phaltan

  फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ ऑक्टोबर - सफाई कामगार कॉलनी शिवीजी नगर, फलटण येथे अंदाजे 3 फुटाचे बोळात, मातीमध्ये पडलेले छोट्या खड्ड्यात नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले असून, अज्ञात इसमावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे त्या नवजात अर्भकावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ८:१५ वाजण्याच्या पूर्वी सफाई कामगार कॉलनी, शिवीजी नगर फलटण येथे, मुकेश अहिवळे यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीस, अर्धा फुट लागुन, अंदाजे 3 फुटाच्या बोळीत मातीमध्ये पडलेल्या छोटया खडयामध्ये, नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने हे नवजात अर्भक, तिचे पालन पोषण व देखभाल न करता, तिचा पूर्णतः परीत्याग करुन तिच्या जिवीतास धोका निर्माण होईल हे माहीत असुनही त्या अर्भकास उपडयावर टाकुन निघुन गेले आहे. 

अधिक तपास साहेब पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

No comments