मिरगाव येथे युवा कीर्तन सप्ताहाचे आयोजन
फलटण (प्रतिनिधी): मिरगाव ता. फलटण येथील समता विकास प्रतिष्ठान व इंचगिरी रसाळ संप्रदाय गुरुभक्त भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'दिपावली' निमित्त दि. ३१ ऑक्टो. ते दि. ४ नोव्हें. दरम्यान युवा कीर्तन सप्ताह व सामुदायिक गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन सरक यांनी दिली.
सप्ताहात अनुक्रमे युवा कीर्तनकार ह.भ.प. शैलाताई महाराज बगाडे(खुंटे, फलटण), हभप शिवाजी महाराज चोरमले (शिरुर, पुणे), हभप अर्पिताताई महाराज अमराळे (आर्वी जि. पुणे), हभप गौरव महाराज मुळीक (झिरपवाडी, फलटण) यांची कीर्तने होतील. दि. ४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत हभप अमेय महाराज शिंदे (वीर, पुरंदर) यांचे काल्याचे कीर्तन होईल.
दि. १ रोजी स.स. सिध्दरामेश्वर महाराज पाथरीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रात्री ९.३० वा. पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दि. २ रोजी दिपोत्सव व मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते दिवंगत हणमंत महाराज सरक व दादू महाराज विरकर(म्हसवड) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अभिवादनपर कार्यक्रम होईल. दि. ३ रोजी दुपारी ४ वा. दिंडीप्रदक्षिणा होणार आहे.
दि. ३१ ते दि.३ दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, काव्य, रांगोळी, चित्रकला, हस्ताक्षर आदी स्पर्धा घेण्यात येतील व दि. ४ रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. कीर्तन संपल्यानंतर अनेक समाजप्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहात काकडा, गाथा पारायण, हरिपाठ, नित्यपाठ आदी उपक्रम होतील.
"एकच ध्यास व्यसनमुक्तीचा" हे ब्रिद उराशी बाळगून अंधश्रद्धा- जातिभेद निर्मूलन, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, सामाजिक समता तसेच संत, समाजसुधारक, अभ्यासक आदींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने हेआयोजन केले आहे. सप्ताहाचे हे १४ वे वर्ष असून सर्व कार्यक्रम मारुती मंदिर मंडपात होतील.
वरील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन सोमतात्या सरक, हभप वसंत महाराज सरक, हभप जालिंदर महाराज वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव सरक, सतिश सरक, भरत सरक, नंदकुमार सरक, किरण सरक, ज्ञानेश्वर सरक, उत्तम सरक, आप्पा सरक, सुखदेव सरक, तुषार सरक, पोपट सरक, प्रवीण फरांदे, समीर मोहिते, गणेश सरक, अक्षय सरक आदींनी केले आहे.
No comments