हातभट्टीच्या विषारी दारु भट्टयांवर छापे ; 3 लाख 14 हजारांचा मुद्देमाल सापडला ; फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ ऑक्टोबर - मौजे मुंजवडी तालुका फलटण गावच्या हद्दीत फलटण ग्रामीण पोलिसांनी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या तीन भट्टयांवर छापे टाकले. यामध्ये २२०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन, ५० लिटर तयार झालेली हातभट्टी विषारी दारू, पातळ गूळ, नवसागर, बाभळीची साल, खराब बॅटरी, गॅस सिलेंडर व इतर साहित्य असा एकूण ३ लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून, आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 30/09/2021 राेजी सकाळी.11.00 वाजण्याच्या सुमारास मौजे मुंजवडी तालुका फलटण गावचे हद्दीत भिवरकर वस्ती येथील पैलवान बाबा मंदिराच्या शेजारी असणारे ओढ्यात 1) वसंत नारायण पवार वय 70 वर्ष 2) शंकर राजेंद्र मसुगडे वय 23 वर्षे 3) मनोज विजय पाटोळे वय 25 वर्ष, सर्व राहणार धर्मपुरी भीम नगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांच्याकडे बेकायदा बिगर परवाना गावठी काढीव हातभट्टीची विषारी दारू तयार करण्यासाठी लागणारे 1 लाख 89 हजार 700 रुपयांचे साहित्य मिळाले आहे. त्यात विषारी दारू तयार करण्यासाठी बाभळीची झाडाची साल, नवसागर, पातळ गुळ सुमारे शंभर किलो, बॅटरीच्या खराब सेल इत्यादी साहित्यासह गावठी हातभट्टीची तयार विषारी दारू 20 लिटर सापडली आहे. छाप्यात सापडलेल्या आंबट- गुळचट वास येत असणाऱ्या सुमारे 1200 लिटर रसायन व सुमारे 100 किलो वजनाचा गुळ या साहित्याचा दोन पंचांसमक्ष नाश करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.
दि. 30/09/2021 दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास मुजंवडी ता.फलटण मुंजवडी तालुका फलटण गावच्या हद्दीत भिवरकर वस्ती येथील पैलवान बाबा मंदिराचे पाठीमागील सार्वजनिक ओढ्यात इसम नामे 1) अर्जुन छगन जाधव वय 25 रा. हनुमंतवाडी तालुका फलटण हा बेकायदा बिगरपरवाना गावठी काढीव हातभट्टीची विषारी दारू तयार करण्यासाठी लागणारे 50,600/- रुपयांचे साहित्य मिळाले आहे. त्यात विषारी दारू तयार करण्यासाठी बाभळीचे झाडाची साल, नवसागर, 80 किलो पातळ गूळ.बॅटरीचे खराब सेल, गॅस सिलेंडर, गॅसची पाइप, दोन बर्नर लायटर इत्यादी साहित्यासह तसेच विषारी काढीव गावठी हातभट्टीची तयार विषारी दारू 15 लिटर सापडली आहे. छाप्यात सापडलेल्या 800 लि. रसायन व सुमारे 80 कि. वजनाचा गूळा चा जागीच दोन पंचासमक्ष नाश करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दराडे करीत आहेत.
दि. 30/9/ 2019 रोजी दुपारी 3.00 वाजण्याच्या सुमारास मौजे मुंजवडी तालुका फलटण गावच्या हद्दीत भिवरकरवस्ती पैलवान बाबा मंदिराजवळ ओढ्यात संगीता बल्या भोसले वय 45 वर्ष रा. मुंजवडी ता.फलटण ह्या बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी विषारी दारू तयार करण्यास लागणारे साहित्य व भट्टी लावून विषारी दारू तयार करत असताना मिळून आल्या आहेत. तिच्या ताब्यात 60 किलो पातळ गुळ, तुरटी, गॅस सिलेंडर, रेग्युलेटर, लाइटर, 1200 लिटर रसायन, 15 लिटर गावठी हातभट्टीची अंबट गुळचट विषारी दारू असे एकूण 70,800 रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अरगडे करीत आहेत.
No comments