राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सातारकर धावले उत्साहात
सातारा, दि.31 (जि.मा.का.) : सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने रन फॉर युनिटी' अर्थात एकता दौड आयोजित करण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी हिरवा झेंडा दाखवून या एकता दौडीचा प्रारंभ केला. सकाळी ठीक 7 वाजता निघालेली एकता दौड पोवई नाका ते जिल्हा क्रीडा संकुल अशी आयोजित करण्यात आली होती. विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य अशा विविध घोषणा देत आणि घोष वाक्यांचे फलक घेऊन सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थींनी यांचा दौडीत समावेश होता.
यावेळी प्रांताधिकारी श्री. मुल्ला यांनी राष्ट्रीय एकता दौडचे महत्व विषद करुन दौड मध्ये सहभाग घेतलेल्यांना शुभेच्छा दिल्या.
लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे फलक ठरले एकता दौडेतील आकर्षण
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे, लाच मागितल्यास तक्रार कुठे करावयाची यासह अनेक विविध फलक घेऊन लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी, कर्मचारी या एकता दौडमध्ये सामील झाले होते हे फलक एकता दौडमधले आकर्षण ठरले
No comments