मोटार सायकलींच्या अपघातात २ ठार ४ जखमी ; वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ नोव्हेंबर - आसू ते फलटण रोड वर मठाचीवाडी गावच्या जाणाऱ्या रोडवर एकापाठोपाठ येणाऱ्या दोन मोटारसायकलीना फलटणकडे जाणाऱ्या मोटारसायकलने समोरुन जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये युवक ठार होऊन अन्य पाचजण जखमी झाले होते, त्यापैकी उपचार घेत असताना वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एकूण दोन ठार तर चार जण जखमी झालेले आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास आसु ते फलटण रोडवर, मठाचीवाडी गावाकडे जाणात्या रस्त्यावर अभिषेक एकनाथ गलांडे व त्याचे मित्र सुरज सुनिल आडके व सोमनाथ भंडलकर दोन्ही रा.दुधेबावी ता.फलटण हे तिघे मित्र, मोटरसायकल नं.एम एच ४२ बीडी ९३८० वरून, फलटण बाजुकडे चालले होते, सुरज आडके हा मोटारसायकल चालवीत होता. त्यावेळी समोरील बाजुने, फलटणवरून आसुकडे येणाऱ्या, दोन मोटरसायकलींना, समोरुन जोरात धडक दिल्याने, झालेल्या अपघातात, तिघा मित्रांपैकी अभिषेक एकनाथ गलांडे यास डोक्यात गंभीर दुखापत तसेच सुरज आडके यास गंभीर दुखापत झाली. आणि समोरून येणाऱ्या दोन मोटरसायकल पैकी एका मोटरसायकलवरील दत्तात्रय उद्धव शिंदे व लिलाबाई उद्वव शिंदे दोन्ही रा. हणमंतवाडी ता.फलटण यांना व दुसऱ्या मोटारसायकलवरील अरविंद कृष्णा शेलार रा.मठाचीवडी ता.फलटण यांच्या डाव्या मांडीस फ्रॅक्चर झाले. तर तिघा मित्रांच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला सोमनाथ मालोजी भंडलकर वय 25 वर्षे रा.दुधेबावी ता.फलटण याचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद अभिषेक एकनाथ गलांडे रा. गणेशशेरी धुळदेव, ता. फलटण यांनी दिली आहे.
त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला सुरज सुनील आडके रा. दुधेबावी ता .फलटण जि सातारा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वृद्ध महिला लिलाबाई शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
No comments