बारामतीचा अभिषेक ननवरे ने १८ व्या वर्षी मिळवला आयर्नमॅन किताब
वडील सतीश ननवरे यांच्या समवेत अभिषेक |
Abhishek Nanavare from Baramati got the Ironman at the age of 18
बारामती (गंधवार्ता वृत्तसेवा) - बारामती येथील अभिषेक सतीश ननवरे याने वयाच्या १८ व्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत नवीन विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत निर्धारित वेळेपूर्वीच अत्यंत कमी वेळात स्पर्धा पूर्ण करत आयर्नमॅन’ हा मानाचा किताब मिळविला आहे. अभिषेकने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन केलं जात आहे.
शारिरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेकने १८० किलोमीटर सायकलींग, ४२.२ किलोमीटर धावणे आणि समुद्रात ३.८ किलोमीटर अंतर पोहणे ही आव्हाने १३ तास ३३ मिनीटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण केली. अभिषेकचे वडील सतिश ननवरे यांनी यापूर्वी आयर्न मॅन हा किताब पटकविला आहे. वडीलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अभिषेकने अवघ्या अठराव्या वर्षीच ही यशस्वी कामगिरी केली.
अभिषेक भारतातला सर्वात कमी वयाचा आयर्नमॅन आहे. अभिषेक हा बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो आयर्नमॅनसाठी तयारी करत होता.
No comments