औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्लक जागांवर 18 नोव्हेंबरपर्यंत समुपदेशन फेरीद्वारे प्रवेश प्रक्रिया
सातारा (जिमाका): सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील शिल्लक राहिलेल्या जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे संस्थास्तरावर 18 नाव्हेंबर 2021 अखेर भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व नोंदणीकृत उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय व व्यवसायनिहाय उपस्थित रहावे, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.
रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे. बेसिक कॉसमेटिक 6, वीजतंत्री 20, फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी 8,फोंड्रीमन 42, मशिन ॲग्रीकल्चर 1 व मॅकॅनिकल मशिन टुल मेंन्टेनन्स 1.
18 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रवेशोच्छुक व नोंदणीकृत उमेदवारांनी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत व्यक्तीश: हजर राहून समुपदेशन फेरीकरीता दररोज स्वतंत्ररित्या हजेरी नोंदवावी. तसेच दुपारी 1 वाजल्यापासून संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी हजेरी नोंदविलेल्या उमेदवारामधून गुणवत्ता यादी प्रकाशित करणे, गुणवत्ता यादीप्रमाणे हजर असलेल्या उमेदवारांना प्रवेशाकरिता त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार उमेदवारांना प्रवेशाकरिता उपलब्ध जागांचे वाटप करणे व प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मुळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनुसार प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.
No comments