Breaking News

आघाडी सरकारने इंधनाचे दर कमी करावेत अन्यथा भाजपाकडून आंदोलन

The alliance government should reduce fuel prices, otherwise there will be agitation from BJP

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  फलटण तालुका भाजपचे वतीने, महाविकास आघाडी चे  राज्य सरकारने पेट्रोल डिझेल चे दर कमी करावेत यासाठी  तहसिलदार समीर यादव यांना जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, किसान मोर्चा चे शहराध्यक्ष नितिन वाघ, शहर उपाध्यक्ष निलेश चिंचकर, माढा विस्तारक शरद झेंडे, माऊली नाळे,  बाळासाहेब कुंभार, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राजेश शिंदे, कार्यालयीन प्रमुख ऋषिकेश वादे, अनिल धुमाळ,यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

     यावेळी बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या आधी पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे,  अन्यथा आम्हाला  तीव्र आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा जयकुमार शिंदे यांनी दिला  आहे.

    आपल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती. आपल्या पक्षानेही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता मोदी सरकारने पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आपल्या आघाडी सरकारनेही कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे, ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापी, अजूनही महाविकास आघाडी सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने, आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे.असे मत तालुका अध्यक्ष बजरंग गावडे यांनी व्यक्त केले.

    देशातील एकूण २२ राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात अधिकची सवलत दिली आहे व त्यामध्ये भाजपाशासित राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महाराष्ट्र राज्याने मात्र अद्याप सवलत दिलेली नाही,तरी लवकर निर्णय घ्यावा असे मत शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी व्यक्त केले.

No comments