युवकाने केले स्वतःला दफन ; दुधेबावी येथील प्रकार
निलेश नाळे यास खड्ड्यातून बाहेर काढताना पोलीस हवालदार लिमन |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ नोव्हेंबर - वडिलोपार्जित शेतीचे वाटप झाले नाही या कारणामुळे वैफल्यग्रस्त होऊन, दुधेबावी ता. फलटण येथील तरुणाने स्वतःला दफन करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या कार्यतत्परतेने वेळीच त्याचा शोध घेऊन त्यास दफन करून घेण्यापासून परावृत्त करून त्याचा जीव वाचवला.
निलेश नाळे यास खड्ड्यातून बाहेर काढताना |
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे दुधेबावी गावच्या हद्दीत, वांजाळे वस्ती येथील निखिल नाळे यांचा, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार रामदास लीमन यांना, त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअपवर काल मेसेज आला की, मी निखिल नाळे, आज आत्ता मावळत्या सूर्याला नमस्कार करून, माझ्या वडिलोपार्जित जमिनीत स्वतः दफन करून घेत आहे. वगैरे मजकूर मेसेज आला. त्यानंतर पोलीस हवलदार लीमन यांनी, आलेले मेसेज चे फोनवर फोन केला, परंतु कॉल लागत नव्हता, नंतर पोलीस पाटील हनुमंत सोनवलकर दुधेबावी ता. फलटण यांचेशी संपर्क साधला असता, त्यांच्या ओळखीचा निखिल नाळे असल्याचे समजताच, पोलीस हवालदार लीमन यांनी, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे श्री धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक व सहा पोलीस निरीक्षक श्री अक्षय सोनवणे यांना सदर बातमी सांगितली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली ड्रायव्हर यादव यांना घेऊन, दुधेभावी - वडले वांजळे वस्ती असा शोध घेऊन, निखिल नाळे याच्या शेतामध्ये त्याचा शोध घेतला असता, निखिल नाळे याने स्वतःला सुमारे तीन फूट खड्ड्यांमध्ये, पुरून घेतले असल्याचे दिसले. व थोडासा भाग छातीपासून डोक्यापर्यंत शिल्लक होता व तो माती अंगावर घेऊन स्वतःला दफन करून घेत असताना दिसून आला. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामदास लीमन, ड्रायव्हर यादव व पोलीस पाटील श्री सोनवलकर व नानासो नाळे रा. वडले यांनी कार्यतत्परता दाखवुन त्याचा शोध घेऊन त्याने दफन करून घेत असल्या ठिकाणावरुन त्यास बाहेर काढून त्याला दफन करून घेण्यात पासून परावृत्त करून त्याचे प्राण वाचवले.
सदर युवकाने वडिलोपार्जित शेतीचे अद्याप पर्यंत वाटप झाले नाही या कारणामुळे वैफल्यग्रस्त होऊन हा प्रकार केला होता. त्यांच्या कौटुंबिक जमिनीच्या वादाबाबत न्यायालयात केस चालू असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली.
No comments