Breaking News

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Appeal to students from minority communities to apply for scholarships

    सातारा  (जिमाका) :   अल्पसंख्यांक समाजातील  विद्यार्थ्यांनी प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना 2021-22 साठी ऑनलाईन अर्ज 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत करण्याचे आवाहन जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धनंजय चोपडे यांनी केले आहे.

    केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक समाजातील इ.1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व 2021-22 शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. प्रि मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अर्ज नवीन भरण्यासाठी व नूतनीकरणासाठी 15 नाव्हेंबर 2021 अशी अंतिम मुदत आहे, असेही श्री. चोपडे यांनी सांगितले.

No comments