नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहर व तालुक्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशावरुन फलटण नगर परिषदेचे आरोग्य समिती सभापती सनी (दादा) अहिवळे यांच्या वाढदिवसा निमित्त, सोनिया चेरिटेबल ट्रस्ट व नगरसेवक सनीदादा अहिवळे मित्रमंडळाच्या वतीने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मंगळवार पेठ, फलटण येथे आज दि. १० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वा. पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
फलटण शहर व तालुक्यामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबीरात सहभाग घ्यावा व आपल्याकडून कोणाला तरी जीवदान देण्यात हातभार लावावा असे आवाहन सोनिया चेरिटेबल ट्रस्ट, मंगळवार पेठ, फलटण व नगरसेवक सनीदादा अहिवळे मित्रमंडळ, फलटण यांनी केले आहे.
No comments