फलटण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यु ; 32 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण मध्ये QH Talbros प्रायव्हेट लिमिटेड शिरवळ या कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यू दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी संपन्न झाले. सदरची कंपनी वाहनाचे भाग जसे की गॅस्केट, हीट शील्ड, फोर्जिंग, सस्पेन्शन सिस्टीम, आणि अँटी व्हायब्रेशन उत्पादने बनविण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. या कंपनीमार्फत एच. आर. मॅनेजर विकास पंडिरे हे उपस्थित होते. फलटण परिसरातील असंख्य विद्यार्थी या कॅम्पस इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहिले होते यापैकी 32 विद्यार्थ्यांची या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विदुर गुंडगे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना नोकरी साठी आवश्यक कौशल्य संपादित करण्यासाठी वेगवेगळी प्रशिक्षण शिबिरे महाविद्यालयामार्फत आयोजित केली जातात व इंडस्ट्रीला आवश्यक असा अभियंता या महाविद्यालयांमध्ये घडवला जातो व त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी नेहमीच उपलब्ध करून दिल्या जातात अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी दिली.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, चेअरमन, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.
No comments