Breaking News

ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची मागणी ; दि. १७ पासून उपोषण

Demand for suspension of rural police station officer

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  - ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी हे तक्रारदार व्यक्तीस बोगस केस करण्यास सांगत आसल्याच्या व्हायरल ऑडीओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर  संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याचे निलंबन करण्याची मागणी केली असून, आझाद समाज पार्टी च्या वतीने दि. १७ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार  असल्याचे आझाद समाज पार्टी प.महाराष्ट्र अध्यक्ष सनी काकडे यांनी सांगितले.

आजाद समाज पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. याप्रसंगी आझाद समाज पार्टी प.महाराष्ट्र अध्यक्ष सनी काकडे, मंगेश प्र आवळे, अतिश कांबळे, महादेव गायकवाड,सुरज भैलुमे उपस्थित होते.

 दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकार्याने पुढील व्यक्ती विरोधात कशी बोगस केस दाखल करायची ते दि. ११/११/२०२१ रोजी संगीतले होते. त्याचे संभाषन ऑडीओ क्लीप  व्हायरस झाली आहे. तक्रारदारास सुशिक्षित मुलांवर बोगस केस करायला लावुन त्यांचे करीअर बरबाद करणार्‍या आधिकार्‍याच्या विरोधात दि. १७/११/२०२१ रोजी फलटण आझाद समाज पार्टी आमरण उपोषण करनार आहे. अशा या  आधिकार्‍यावर कडक कारवाई करुन सेवेतुन हाकलपट्टी करावी व चौकशी करण्यात यावी  आन्याथा आझाद समाज पार्टी महाराष्ट्र भर आंदोलन छेडणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

No comments