Breaking News

वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; ज्ञानराज हॉटेलवर छापा

Exposing a racket supplying women for prostitution; Raid on Dnyanraj Hotel

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ नोव्हेंबर -  वडजल ता. फलटण गावच्या हद्दीत, पुणे - पंढरपूर महामार्गाच्या लगत, होटेल ज्ञानराज अँड लॉजिंग येथे, फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून, वेश्याव्यवसाया करिता महिला व हॉटेल रुम पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी  ४ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक गोडसे, पो.उ.नि. अरगडे, पो. ना. सूर्यवंशी, पो.कॉ. लांडे, व पोलीस हेडकोन्स्टेबल श्रीमती पेंदाम खाजगी वाहनातून निंभोरे, सुरवडी व कमिन्स कंपनी परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा वडजल, ता. फलटण गावचे हद्दीत फलटण - लोणंद रोडलगत असलेल्या हॉटेल ज्ञानराज अँण्ड लजिंग या ठिकाणी प्रविण रंगराव पवार नावाचा इसम त्याचेकडील व्हॉट्सअप वरुन महिलांचे फोटो वेशाव्यवसाया करीता गिऱ्हाईकांना पाठवुन, वेशाव्यवसाया करीता मुली पुरवित आहे, अशी बातमी पो. नि. गोडसे यांना मिळाल्या नंतर पो.नी.गोडसे  यांनी  सदर बातमीचा आशय  समजावुन सांगुन छाप्याचे नियोजन केले. त्यानंतर छाप्याकामी दोन पंच व बनावट गिऱ्हाईक,  व छाप्यासाठी लागणारे साहित्य असे सर्वजण दि. २४ नोव्हेंबर रोजी ५ :१० वाजण्याच्या सुमारास कमिन्स कंपनीजवळ आले. 

     बनावट गिऱ्हाईक यांनी हॉटेल ज्ञानराजमध्ये जाऊन तेथील संशयित प्रविण रंगराव पवार यांचेशी संपर्क साधुन वेशाव्यवसायासाठीच्या मुली पाहुन, पसंत करुन, व्यवहार ठरवला. उर्वरित टीम ने हॉटेलच्या आवारात वेगवेगळ्या ठिकाणी थांबले,  पो.नि. गोडसे यांनी सर्वांना इशारा करताच छापा पथकाने हॉटेल ज्ञानराज मध्ये प्रवेश केला असता, हॉटेल ज्ञानराज अँण्ड लॉजिंग इमारतीमधील रूम नंबर १०६ मध्ये, आरोपी प्रवीण रंगराव पवार वय ३२ वर्षे रा. विडणी  ता. फलटण हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता,   २७ वर्षीय महिलेस (मूळ राहणार  बर्धमानबाडिया, उत्तर २४ परगणा, भैरवपुर, गोपालनगर, पश्चिम बंगाल) वेश्या म्हणून शरीरसंबंधासाठी गिर्‍हाईकांना पुरवीत असताना मिळून आला. तसेच बनावट गिऱ्हाईकाकडे  निशानी करून देण्यात आलेल्या, नोटा प्रवीण रंगराव पवार याच्याकडे सापडल्या. तसेच हॉटेल ज्ञानराजचा मॅनेजर अर्जुन जयसिंग बर्गे याने हॉटेलचा कारभार पाहात असताना, आरोपी प्रवीण रंगराव पवार हा त्यांच्या लॉजमधील भाड्याने घेत असलेल्या खोल्यांचा वापर कुंटण खाना याप्रमाणे करीत असल्याचे माहीत असून सुद्धा त्यास  वेश्या व्यवसायाकरिता खोल्या भाड्याने दिल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार  1) प्रवीण रंगराव पवार वय 32 वर्षे राहणार विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा 2) हॉटेल मॅनेजर अर्जुन जयसिंग बर्गे वय 37 वर्षे राहणार चिंचनेर वंदन तालुका जिल्हा सातारा 3) हॉटेल ज्ञानराज अँण्ड लॉजिंगचे मालक यांच्याविरुद्ध  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे करीत आहेत.

No comments