आसू नं.१ मध्ये जबरी चोरी ; गजनी विरोधात गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ नोव्हेंबर - पिक कर्ज प्रकरण मंजुर करण्यास उशीर झाल्याचा राग मनात धरुन, आसु नं 1 विकास सोसायटीच्या सचिवास कानाखाली मारून, ड्रॉव्हर मधून १ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम पळवून नेल्याप्रकरणी आसू तालुका फलटण येथील गजनी उर्फ अक्षय पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास मौजे आसु ता. फलटण येथील आसु नं १ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड आसु यासंस्थेच्या कार्यालयात सचिव नयन बापूराव कांबळे हे एकटेच सोसायटीचे कामकाज करीत बसले होते. त्यावेळी गजनी उर्फ अक्षय बापुराव पवार रा. आसु ता. फलटण याने सोसायटीच्या कार्यालयात येवुन, त्याची आजी श्रीमती सुलाबाई पवार हिचे पिक कर्ज प्रकरण मंजुर करण्यास उशिर झाल्याचा राग मनात धरुन, सचिव नयन कांबळे यांच्या कानाखाली चापट मारली व टेबलच्या उजव्या ड्राव्हरमधील १ लाख २० हजार ४०० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले असल्याची फिर्याद संस्थेचे सचिव नयन बापूराव कांबळे यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धराडे हे करीत आहेत.
No comments