Breaking News

खटकेवस्ती येथे शेतात तीन पानी जुगार ; बारा जणांवर गुन्हा दाखल

Gambling at Khatkevasti; Twelve people have been charged

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १० नोव्हेंबर - खटकेवस्ती ता. फलटण गावच्या हद्दीत, शेतामध्ये जुगार खेळण्यासाठी क्लब तयार करून, पैशावर तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळल्या प्रकरणी १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास खटकेवस्ती गावच्या हद्दीत, वड्याचा माळ नावाच्या शिवारात, गणेश नारायण खटके यांच्या ऊसाच्या शेताजवळ, आंब्याच्या झाडाखाली, 1) पाया शंकर निंबाळकर राहणार डोरलेवाडी तालुका बारामती, २) महादेव रामभाऊ खटके राहणार खटके वस्ती तालुका फलटण, ३) गणेश नारायण खटके राहणार खटकेवस्ती तालुका फलटण, ४) नितीन बापूराव कदम राहणार गवळीनगर तालुका फलटण, ५) अशोक वामन घाडगे राहणार घाडगेमळा तालुका फलटण, ६) सुनील खटके.  ७) अमोशा वाघमोडे ८) अजित मिंड ९) रामभाऊ वाघमोडे १०) गोरख पवार ११) लखन शेख १२) अजित गावडे हे सर्वजण तीन पानी पत्त्यावर, पैसे लावून, जुगार खेळत असताना सापडले.  त्यांच्या कब्जात जुगाराचे साहित्य,  रोख रक्कम, मोबाईल, टेबल , खुर्च्या , पत्त्याची पाने असे एकूण, ७७ हजार २८० रुपये किमतीचे साहित्य मिळून आले आहे. 

त्यानुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 a प्रमाणे सर्व आरोपी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे हे करीत आहेत.

No comments