मैत्रिणीस भेटायला गेलेल्या युवकावर सुरा हल्ला; जीवे मारण्याचा प्रयत्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ७ नोव्हेंबर - मैत्रिणीस भेटायला गेलेल्या युवकास, मैत्रिणीच्या घरच्यांनी सुरा भोसकून गंभीर जखमी करून, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी, पाचबत्ती चौक फलटण येथील तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ/ वृषभ वसंत माने रा.साठेफाटा ता.फलटण हा दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पाचबत्ती चौक, फलटण येथे मैत्रिणीस भेटण्यासाठी तिच्या घरी आला, त्याचा राग मनात धरून तिचा भाऊ मोहसीन व त्याचे वडील साबीर शेख, आई रजिया शेख यांनी, सोमनाथ /वृषभ यास जीवे मारण्याच्या उद्देशाने सुऱ्याने गंभीर वार करून जखमी केले आहे. तसेच मैत्रीण (शेख) हिला देखिल तिच्या भावाने भिंतीवर डोके आपटल्याने ती जखमी झाली असल्याची फिर्याद सोमनाथ /वृषभ याची आई सौ उमा वसंत माने रा. साठेफाटा ता. फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. हे करीत आहेत.
No comments